Print Recipe
झटपट सांबार
Servings |
|
Ingredients
- 1/3 कप तुरडाळ
- 1/4 कप मुगडाळ
- 1 कांदा बारीक चिरलेला
- 1 टोमॅटो बारीक चिरलेला
- 1 बटाटा मोठे तुकडे करून
- 1 वांगे बारीक तुकडे करून
- शेवग्याच्या शेंग तुकडे करून
- 1/2 टीस्पून चिंच पाण्यात भिजत घालावी
- 1 आणि 1/2 टेबलस्पून गूळ
- 1/2 टीस्पून हळद
- 2 टीस्पून मालवणी हिरवा मसाला
- 3-4 टीस्पून सांबर मसाला
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- मीठ
- फोडणीसाठी -
- 1 टेबलस्पून तेल १
- 1 सुकी लाल मिरची
- 1 टीस्पून मोहरी
- 1/2 टीस्पून हिंग
- कढीपत्ता
- 1/2 टीस्पून मेथी
Ingredients
|
|
Instructions
- तुरडाळ व मुगडाळ एकत्र करून २ पाण्याने स्वच्छ धुवावी व १/२ तास पाण्यात भिजत ठेवावी.
- भिजलेली डाळ कुकरच्या डब्यात घालावी त्यात हळद घालावी व १ कप पाणी घालावे.
- कुकरच्या दुसऱ्या डब्यात वांग, बटाटा, टोमॅटो, कांदा व शेवग्याच्या शेंग एकत्र करून त्यात १ कप पाणी घालावे.
- डाळ खाली व भाजीचा डबा वर असे एकावर एक डबे ठेवून कुकरला ४ शिट्टया करून घ्याव्यात.
- शिजलेली डाळ गरम असतानाच घोटून घ्यावी म्हणजे चांगली एकजीव होते.
- गॅसवर पातेले गरम करून घ्यावे त्यात तेल घालून मोहरी, कढीपत्ता, मिरची,मेथी, व हिंग यांची फोडणी करावी.
- हिरवा मसाला व सांबर मसाला घालून चांगले परतून घ्यावे.
- वरील फोडणीत डाळ घालून परतावी.
- शिजलेल्या भाज्या, गूळ, चिंचेचा कोळ, मीठ, कोथिंबीर घालून परतावे व १० मिनिटे गॅस मंद करून सांबर शिजू द्यावे.
- थोड्या वेळाने सांबर शिजून घट्टसर होईल.